आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banks Not Buy Gold Coin To The Custmor P. Chidambaram

बँकांनी ग्राहकांना सोने खरेदीसाठी प्रोत्साहन देऊ नये - पी. चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोन्याच्या वाढत्या आयातीवर सरकारला नियंत्रण ठेवणे अशक्य असून आरबीआयच्या निर्देशानुसार आता बँकांनीच आपल्या ग्राहकांना सोन्याची नाणी विकू नये अथवा प्रोत्साहन देऊ नये असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

पी. चिदंबरम आज मुंबईत इंडियन बँक्स् असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत होत असलेल्या चढ-उतारामुळे भारतात सोने खरेदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सामान्य लोक मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे भारताला आयात शुल्क मोठ्याप्रमाणावर द्यावे लागत आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्‍थेवर व देशांतर्गत वित्तीय संस्थांवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही व देशाच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे बँकांनीच आता आपल्या ग्राहकांना सोन्याची नाणी खरेदी न करण्‍याचा सल्ला द्यावा असे आवाहन च‍िदंबरम यांनी बँकांना केले.

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकार भविष्‍यात सोन्याच्या आयातीवर निर्बंध आणण्‍याचा विचार करत असल्याची माहिती चिदंबरम यांनी दिली. एप्रिल व मे या मागील दोन महिन्यात देशात सुमारे 150 टन सोने आयात झाले आहे. त्यासाठी देशाने तब्बल 15 अब्ज डॉलर परकीय गंगाजळी खर्च केली आहे. त्यामुळे सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात 6 वरून 8 टक्के वाढ करण्‍यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.