आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Banks Told To Issue Debit, Credit Cards With User's Photo

डेबिट कार्डवर ग्राहकांचा फोटो द्या; आरबीआयकडून बँकांना सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चोरलेल्या कार्डांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी बँकांनी ग्राहकाच्या छायाचित्रासह डेबिट वा क्रेडिट कार्ड द्यावे, असा सल्ला रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाकडून देण्यात आल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली.

क्रेडिट वा डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास त्याचा होणारा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने अशा कार्डावर संबंधित ग्राहकाचे छायाचित्र लावणे किंवा अन्य कोणत्याही अत्याधुनिक पद्धतीचा वापर बॅँकांनी करावा, अशा सूचना ‘आरबीआय’ कडून सर्व बॅँकांना देण्यात आल्या असल्याचे वित्त राज्यमंत्री नमोनरेन मीणा यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले. क्रेडिट कार्डाच्या बाबतीत पिन क्रमांक आणि स्वाक्षरी लॅमिनेट केलेले कार्ड किंवा अन्य कोणत्या तरी आधुनिक पर्यायाचा वापर करावा, असेही बॅँकांना सांगण्यात आले असल्याचे मीणा यांनी लेखी उत्तरात सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून विविध ऊर्जा वितरण कंपन्यांना 31 मार्च 2012 अखेरपर्यंत 1,37,191 कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण 6.98 कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.