आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयकडून रेपो रेटमध्‍ये पाव टक्‍के कपात, इएमआय घटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्‍ह बँकेने गृहकर्जधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. रेपो रेटमध्‍ये पाव टक्‍के कपात करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे गृहकर्जाच्‍या मासिक हप्‍त्‍याची रक्कम काही प्रमाणात घटण्‍याची शक्‍यता आहे. रिझर्व्‍ह बँकेने कॅश रिझर्व्‍ह रेशो अर्थात सीआरआरमध्‍ये कोणताही बदल केला नसून सीआरआर 4 टक्‍क्‍यांवर कायम आहे.

आरबीआयने आज तिमाही पतधोरण जाहीर केले. रेपो रेटमध्‍ये पाव टक्‍का कपात केल्‍यामुळे बँका कर्जावरील व्‍याजदरही लवकरच कमी होतील अशी अपेक्षा आहे. गेल्‍या वेळेस आरबीआयने व्‍याजदरात कपात केली होती. तब्‍बल 9 महिने रेपो रेट 8 टक्‍क्‍यांवर ठेवला होता. त्‍यानंतर पाव टक्‍के कपात करण्‍यात आली होती. आता त्‍यात पुन्‍हा तेवढीव कपात करण्‍यात आली आहे.