आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RBI Governor Raghuram Rajan Announces Monetary Policy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RBI ने रेपो रेटसह प्रमुख दर कायम ठेवले, SLR मध्ये अर्ध्या टक्क्याने कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आरबीआयने पतधोरण आढावा जाहीर करताना रेपो रेटसह प्रमुख दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. केवळ SLR मध्ये अर्ध्या टक्काने कपात करण्यात आली आहे. SLR मधील कपातीमुळे चलन प्रवाहात आणखी लिक्विडिटी येण्याची शक्यता आहे. सध्या रेपो रेट 7.75 टक्के तर सीआरआर 4.0 कायम ठेवण्यात आला आहे. SLR घटून 21.50 झाला आहे. नवीन दर 7 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
उद्योग जगाकडून होणारी मागणी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आरबीआयकडून प्रमुख दरांमध्ये कपात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, यावेळी व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अशा स्वरुपाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2015 रोजी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आरबीआयने दरांध्ये पाव टक्क्यांनी घट केली होती. त्यानंतर काही बॅंकांनी व्याज दरात ग्राहकांना सुट दिली होती.
राजन यांना आहे अर्थसंकल्पाची प्रतिक्षा
राजन म्हणाले, की व्याज दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या महागाईच्या आकड्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज भासल्यास काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जातील.
सुधारित जीडीपी आकड्यांवर केले नाही वक्तव्य
राजन म्हणाले, की जीडीपीच्या सुधारित आकड्यांवर सध्याच वक्तव्य करणे घाईचे ठरेल. यासंदर्भात राजन यांनी मौन धारण केले असल्याने रहस्य वाढले आहे. 2014-15 साठी विकसदर 5.5 राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 9 फेब्रुवारीला जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यावर राजन यांचे लक्ष असणार आहे. आरबीआयचा पुढील पतधोरणा आढावा 7 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.
व्याज दरात कपात न करणाऱ्या बॅंकांना खडसावले
आरबीआयने प्रमुख दरांमध्ये बदल केल्यावर त्याचा लाभ बॅंकांनी आपल्या ग्राहकांना दिला पाहिजे. काही बॅंकांनी यापूर्वी बेस रेटमध्ये कपात केलेली नाही. पण ते किती दिवस स्वतःला रोखून धरतील. कधी ना कधी त्यांना हा निर्णय घ्यावाच लागणार आहे, असा चिमटा राजन यांनी काढला.