आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Guidelines On Failed ATM Transactions Give Customer Right To Complaint In Bank Warren Buffet

ATM ट्रान्झेक्शन Fail झाले आणि बॅलेन्स कमी झाला तर बॅंक देईल प्रति दिन 100 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एटीएमवर व्यवहार करताना तुम्हाला रुपये मिळाले नाही आणि तुमच्या खात्यातील शिल्लकही कमी झाली असेल तर मुळीच घाबरु नका. संबंधित बॅंकांना कपात झालेल्या रुपयांसह तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून 100 रुपये प्रति दिन मोबदला देण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपला बॅंकिंग व्यवहार पारदर्शक झाला असला तरी काही कारणांमुळे ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एखादा ग्राहक बॅंकेच्या एटीएमवर रुपये काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला रुपये मिळत नाही आणि त्याच्या खात्यातून रुपये कमी झाल्याचा मेसेज येतो. या स्थितीत ग्राहकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच कपात झालेले रुपये परत मिळतील की नाही, याविषयीही त्याच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे राहात असतात. मात्र, ग्राहकांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांसाठी एक नियम तयार केला आहे. त्याआधारे ग्राहक संबंधित बॅंकेकडे तक्रार नोंदवून कपात झालेल्या रकमेसह नुकसान भरपाई मिळवू शकतात.
काय आहे उपाय...
तुमचे खाते असेल त्या बॅंकेच्या अथवा दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून व्यवहार केला असेल तरी तुम्हाला तक्रार नोंदवण्याचा अधिकार आहे. तुम्ही आपल्या बॅंकेत तक्रार नोंदवून कपात झालेल्या रुपयांसह नुकसान भरपाई म्हणून 100 रुपये प्रतिदिन मागू शकतात.

काय आहेत आरबीआयचे निर्देश
आरबीआयने मे 2011 मध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार, अशा प्रकारची तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत (वर्किंग डेज) बॅंकेने ग्राहकाच्या खात्यावर कपात झालेले रुपये जमा करणे बंधनकारक आहे. मे 2011 पूर्वी हा कालावधी 12 दिवसांचा होता.