आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍याजदर जैसे थे, आरबीआयकडून तिमाही पतधोरण जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी तिमाही पतधोरण जाहीर केले असून बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे रेपो रेट 7.25 टक्के आणि कॅश रिझर्व्ह रेशो 4 टक्क्यांवर कायम राहिला आहे. रुपयाच्‍या अवमुल्‍यनावर बँकेने चिंता व्‍यक्त केली आहे. रुपया घसरल्‍यामुळे महागाई वाढण्‍याची भीती आहे. त्‍यामुळे महागाई रोखण्‍यासाठी कडक पावले उचलण्‍यात येतील, असे बँकेने स्‍पष्‍ट केले आहे.

बँकने विकासदर 5.7 टक्‍क्‍यांवरुन 5.5 टक्‍क्यांवर आणला आहे. रुपयाचे अवमुल्‍यन रोखण्‍यासाठी बँकेने काही कठोर पावले उचलली आहेत. परंतु, रुपया स्थिरावल्‍यानंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने निर्बंध उठविण्‍यात येतील, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.