आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RBI May Cut Interest Rate Further In Policy Review This Week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदर कपात शक्य, कर्जे आणखी स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात प्रमुख व्याजदरांत ०.२५ टक्के आणखी कपात केली जाण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती बँक मंगळवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेणार आहे. महागाई नियंत्रणात आली असतानाच कोल इंडियाच्या विक्रमी निर्गुंतवणुकीमुळे राजकोशीय स्थिती भक्कम झाल्याने रिझर्व्ह बँक आढाव्यात हे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बँकेने मागील महिन्यात रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात करून आश्चर्याचा धक्का दिला होता. वीस महिन्यांच्या कठोर उपायांनंतर पहिल्यांदाच नरमाई दाखवत १५ जानेवारी रोजी रेपो रेट ८ वरून ७.७५ टक्क्यांवर आणला होता.

कर्जे आणखी स्वस्त : रिझर्व्ह बँकेच्या पुढाकारानंतर सरकारी क्षेत्रातील युनियन बँक आणि युनायटेड बँकेने बेसरेटमध्ये तेवढीच कपात करून कर्जे स्वस्त केली होती. मंगळवारी पुन्हा व्याजदर कमी झाल्यास बँका कर्जाच्या व्याजदरात कपात करू शकतील.