आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षे खात्यावर व्यवहार न केल्यास पैसे रिझर्व्ह बँकेकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - एखाद्या खात्यावरून दहा वर्षांपर्यंत कोणताच व्यवहार झाला नसेल तर त्यावरील सर्व पैसा रिझर्व्ह बँकेकडे जाईल. आरबीआयच्या ताज्या निर्देशांमुळे ही व्यवस्था राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व सहकारी बँकांनाही हा नियम लागू असेल. खातेधारकाने पुरावे सादर करुन ओळख पटवून दिल्यानंतर खात्यावरील पैसा त्याला परत मिळू शकेल. तसेच रिझर्व्ह बँक संबंधित बँकेला त्या रकमेचा परतावा देईल. त्यासाठी बँकेला देवाण - घेवाणीची माहिती व खात्यावरील पैसा आरबीआयकडे दर महिन्याच्या 15 तारखेला रिटर्नसह जमा करावा लागेल.
रिझर्व्ह बँकेने मंगळवारी त्याची अधिसूचना जारी केली आहे. त्याबाबत सर्व बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व अधिकार्‍यांना माहिती दिली आहे. 24 मे रोजीच्या गॅझेटमध्येही ही अधिसूचना प्रकाशित झाली आहे. या शिवाय आरबीआयकडे पैसा जमा झाल्यानंतर जर एखादा ग्राहक रक्कम परत मागण्यास आला तर त्या ग्राहकाची ओळख पटल्यानंतर बँक त्याला तो पैसा परत करण्यास बाध्य असेल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे या माध्यमातून मिळालेला पैसा आरबीआय ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरणार आहे.

सोने 28 हजारांखाली
दिल्ली 27,700 तोळा
नवी दिल्ली - अमेरिकेच्या अर्थव्यस्थेतील सुधारणांमुळे तसेच स्टॉकिस्टांनी केलेल्या मोठ्या विक्रीमुळे सोने गडगडले. राजधानीत सोने तोळ्यामागे 400 रुपयांनी स्वस्त होऊन 27,700 झाले. चांदी किलोमागे 400 रुपयांनी घसरून 41,400 झाली.