आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RBI Not To Allow MFIs To Charge Interest Of More Than 26%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26 %हून जास्त व्याज नको : आरबीआय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- देशातील सूक्ष्म वित्तीय संस्थांनी (मायक्रो फायनान्स) 26 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज आकारू नये, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शनिवारी दिले. कर्जावर 26 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणे हे शोषण आहे. तुम्ही शोषण करत नसाल तर त्यापेक्षा अधिक व्याज आकारू नका. त्यामुळे आरबीआयने 26 टक्क्यांची मर्यादा आखली असल्याचे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी सांगितले.


ते म्हणाले, देशातील बँकिंग व्यवस्थेला मर्यादा आहेत. त्यामुळे मायक्रो फायनान्सचे महत्त्व लक्षात येते. मात्र, मायक्रो फायनान्स संस्थांनीही त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन पावले उचलावीत. उत्पन्न वाढवणा-या कारणासाठी या संस्थांनी वित्तपुरवठा करावा, असेही त्यांनी सुचवले.