आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढील वर्षी स्वस्त होणार गृहकर्ज, राजन यांचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गृह,वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात पुढील वर्षात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकांचे कर्ज मागील आठवड्यात माफक स्वस्त झाले. विविध बँकांनी आता मुदत ठेवींवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. कर्ज स्वस्त होण्याचे हे संकेत आहेत. अमेरिका मेरिल लिंच आणि यूबीएसनेही रिझर्व्ह बँक येत्या फेब्रुवारीपासून व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यूबीएसने तर दोन वर्षांत व्याजदरांत दोन टक्के कपातीची शक्यता वर्तवली आहे. रिझर्व्ह बँक येत्या ३० सप्टेंबर रोजी पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

फिक्सड रेट कर्जावर जोर
काही काळापूर्वी बँका फिक्सड रेट व्याजाच्या कर्जाबाबत िनरुत्साही होत्या. फ्लोटिंग रेटच्या तुलनेत फिक्सडसाठी बँका दोन ते तीन टक्क्यांनी जास्त कर्ज वसुली करायच्या. मात्र फिक्सड रेटवर कर्ज देण्याची टूम िनघाली. याचे वैशिष्ट्य म्हणजे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी, सिटी बँक या सर्वंाचे फिक्सड रेट कर्जाचे व्याज जवळपास सारखेच आहे. फ्लोटिंगच्या तुलनेत फिक्सड रेट ०.२५ टक्क्यांनीही जास्त नाही. आगामी काळात आता व्याजदर वाढणार नाहीत याचे हे द्योतक आहे.

रिझर्व्ह बँकेसाठी लाभदायी बाबी
- िकरकोळ महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात टक्क्यांच्या खाली.
- मार्च २०१६ पर्यंत महागाई टक्क्यांवर आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य
- ठोक महागाई जुलैमध्ये महिन्यांच्या ५.१९ या नीचांकी स्तरावर
- कच्चे तेल स्वस्त झाल्याने डॉलरच्या मागणीत घट, रुपया मजबूत
- इतर आर्थिक बाबी उत्तम, पहिल्या तिमाहीत विकास दर ५.७ टक्के