आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rbi Restrictions On Gold Import Causes Share Market Rise

बाजारात बरसल्या तेजीच्या धारा, गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 40 हजार कोटींची भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोने आयातीला आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांवर टाकलेले नवे निर्बंध आणि अमेरिकेतील घरांच्या विक्रीत झालेल्या घटीमुळे आर्थिक मदत सुरूच राहण्याची शक्यता यामुळे शेअर बाजारात उत्साह दिसला. या उत्साहातून झालेल्या जोरदार खरेदीच्या तेजीच्या धारा मंगळवारी बरसल्या. सेन्सेक्सने 143.01 अंकांच्या कमाईसह 20,302.13 ही पातळी गाठली. हा महिन्याचा उच्चांक आहे. निफ्टी 46 अंकांची वाढ नोंदवत 6,077.80 वर स्थिरावला.

शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 40 हजार कोटींची भर पडून ती 66.32 लाख कोटींवर पोहोचली.
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब आणि भेल या समभागांना जास्त मागणी होती. आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागांनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक नोंदवला. या दोन समभागांतील वाढीने सेन्सेक्सच्या तेजीत निम्मा वाटा उचलला. मुंबई शेअर बाजारातील सर्व म्हणजेच 13 क्षेत्रीय निर्देशांकांत तेजी दिसून आली. टिकाऊ वस्तू, एफएमसीजी, रिअ‍ॅल्टी आणि बँकिंग निर्देशांकांनी यात आघाडी घेतली.सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 21 समभागांत तेजी दिसून आली. अमेरिकेतील घर विक्रीच्या आकडेवारीत घट झाल्याने फेडरल रिझर्व्ह आर्थिक मदत सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आशियातील प्रमुख बाजार तेजीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारांत किरकोळ तेजी दिसून आली.


निर्बंधांमुळे तेजी

सोने आयातीला आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँकेने टाकलेल्या निर्बंधांमुळे शेअर बाजारात तेजी आली.
जीईपीएल कॅपिटल