आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RBI Slaps Rs 6.5 cr Penalty On 6 Public Sector Banks For Violating KYC Norms

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘केवायसी’चे उल्लंघन; 6 बँकांना 6.5 कोटी दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काळा पैसा व आपला ग्राहक ओळखा (नो युवर कस्टमर : केवायसी) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांना 6.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. आयडीबीआय बँक, देना बँक, इंडियन बँक या बँकांना काळा पैसाविरोधी आणि केवायसीविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे, तर अलाहाबाद बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॉर्पोरेशन बँक या तीन बँकांना केवायसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला.

प्रथमदर्शनी तपासणीत काळ्या पैशांबाबत व्यवहार झाल्याचे दिसत नसले तरी याप्रकरणी सर्व कागदपत्रे तपासण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या बँकांकडून समाधानकारक स्पष्टीकरण आल्यास व त्याची शहानिशा झाल्यास दंड भरावा लागणार नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. यापूर्वी अशाच प्रकरणात रिझर्व्ह बँकेने 25 बँकांना दंड ठोठावला होता.

कोणाला किती दंड
देना बँकेला दोन कोटी रुपये, तर कॉर्पोरेशन बँकेला 1.5 कोटी रुपये दंड करण्यात आला. आयडीबीआय आणि इंडियन बँकेला प्रत्येकी एक कोटी रुपये दंड आकारण्यात आला, तर अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रला प्रत्येकी 50 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.