आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्व बॅंकांना एप्रिल 2014 पर्यंत नवे परवाने - रघुराम राजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बॅंक एप्रिल 2014 पर्यंत देशातील सर्व बॅंकांना नवे परवाने देण्याच्या विचारात असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. राजन एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. याशिवाय देशातील सर्व बॅंकांना एनपीएवर (non performing asset) नियंत्रण राखण्याचे आवाहन करण्‍यात आलेचे राजन यांनी सांगितले आहे.
राजन म्हणाले, बॅंकांना चालु खात्यावर तोटा सहन करावा लागत आहे. तोटा भरून काढण्यासाठी बॅंकाना नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय सरकार बदलल्यानंतर बॅंकाचे परवाने परत घेतले जाणार नसल्याचे सांगून राजन यांनी बॅंकाना दिलासा दिला आहे.
राजन यांच्यानुसार, बाजाराचा विश्वास पुन्हा प्राप्त करणे तसेच महागाईवर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे झाले आहे. त्यामुळे महागाईचा दर 5 टक्क्यांपर्यंत खाली आणखी फारच जिकरीचे होणार आहे. तसेच सप्टेंबरपासून बॅंकांकडून कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झालेल्याचेही राजन यांनी सांगितले. सोने आयातीवर लावण्यात आलेली सक्ती लवकरच उठवण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहे.