आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI To Take Action Against Banks Involved In Money Laundering

मनी लाँडरिंग प्रकरणातील बँकांवर कारवाईचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने अलीकडेच केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांचा कथित मनी लाँडरिंग प्रकरणात सहभाग असल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणानंतर बँकिंग उद्योगात खळबळ माजली होती. आता रिझर्व्ह बँकेने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी या बँकांच्या विरोधात कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

‘कोब्रा पोस्ट’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर रिझर्व्ह बँकेने चौकशी पूर्ण केली काय, असे विचारले असता खान यांनी कार्यवाही प्रक्रिया प्रगतिपथावर असून छाननी पूर्ण झालेली आहे. ही कार्यवाही नियोजनबद्ध आणि
वैयक्तिक बँक पातळीवर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकी कार्यवाही काय केली जाणार याचा तपशील देता येऊ शकणार नसला तरी ही कार्यवाही यंत्रणा तसेच वैयक्तिक बँक पातळीवर करण्यात येणार असल्याचे नॅशनल हाउसिंग बँकेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

हा चैकशी अहवाल रिझर्व्ह बँक प्रसिद्ध कधी करणार याचा नेमका कालावधी माहिती नसला तरी तो लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘कोब्रापोस्ट’ या संकेतस्थळाने अलीकडेच केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या खासगी क्षेत्रातील तीन आघाडीच्या बँकांचा समावेश आहे. काही बँक अधिका-यांनी बेहिशेबी रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवल्याचा कथित आरोप या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला होता. हे कथित प्रकरण उजेडात येताच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी बँकिंग यंत्रणा सुदृढ करण्याच्या दृष्टीने काही योग्य पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले. बँकिंग यंत्रणा चांगली असून चौकशी अहवालाच्या निष्कर्षावर आधारित काही योग्य कृती करण्याची गरज असून ती घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते.

अनेकांचे निलंबन
या स्टिंग ऑपरेशननंतर आयसीआयसीआय बँकेने 18 कर्मचा-यांना निलंबित केले होते, तर एचडीएफसी बँकेने 20 कर्मचा-यांना निलंबित करण्याबरोबरच लेखा चौकशीदेखील सुरू केली. अ‍ॅक्सिस बँकेने या सर्व प्रकरणांची अंतर्गत चौकशी सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील समिती स्थापन करतानाच संबंधित 16 कर्मचा-यांना प्रशासन कार्यालयाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.