आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयच्या निर्णयानंतर या नोटा बदलाव्या लागणार, अशा ओळखा या नोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्‍या नोटा चलनात नसाव्‍या यासाठी आरबीआय जुन्‍या नोटांवर बंदी घालणार आहे. त्‍यामुळे 2005 अगोदरच्‍या सर्व नोट जमा कराव्‍या लागणार आहेत. आरबीआयचा हा निर्णय कधी येईल हे आज सांगता येत नसले, तरी जुन्‍या नोटा जमा कराव्‍या लागणार आहेत हे मात्र नक्‍की. कोणत्‍या नोटा कधी, केंव्‍हा, कुठे बदलाव्‍या लागणार आहेत या संदर्भात पडलेल्‍या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे आम्‍ही आपल्‍याला देणार आहोत.


प्रश्‍न: कोणत्‍या नोटा बदलाव्‍या लागणार, त्‍या कशा ओळखायच्‍या ?


उत्‍तर- तुमच्‍याकडे असलेली नोट, तीच्‍या पाठीमागच्‍या खालच्‍या बाजूला नोट कधी छापण्‍यात आली ते वर्ष लिहलेले असते. ज्‍या नोटांवर अशा प्रकारे वर्षाची नोंद केलीली नाही, त्‍या नोटा बदलाव्‍या लागणार आहेत. 2005 या वर्षापासून छापल्‍या जाणा-या नोटांवर वर्ष छापले जाऊ लागले. याचा आर्थ 2005 च्‍या अगोदर छापल्‍या जाणा-या नोटा आपल्‍याला बदलाव्‍या लागणार आहेत.

प्रश्‍न: 1 एप्रिलनंतर माझ्याजवळ असणा-या नोटा रद्द होतील ?


उत्‍तर- हो, काही प्रमाणात. कारण 1 एप्रिलनंतर या जुन्‍या नोटा अर्थव्‍यसस्‍थेच्‍या बाहेर गेल्‍यात जमा होतील. घाबरू नका, त्‍या नोटा बँकेमध्‍ये आपण जमा करू शकतो.


प्रश्‍न: कधीपर्यंत या नोटा बॅंकेतून बदलू शकतो ?


उत्‍तर- एक एप्रिलपासून या नोटा बदलता येतील. एक जूलैनंतरही या नोटा आपल्‍याला बदलता येतील. परंतु एक जूलैनंतर 500 ते 1000 च्‍या 10 पेक्षा जास्‍त नोटा बदलण्‍यासाठी आपल्‍याला ओळखपत्र द्यावे लागेल.

प्रश्‍न: आरबीआयने नोटांवर 2005 पासून वर्ष छापण्‍याच्‍या निर्णय का घेतला ?


उत्‍तर- 2005 अगोदर छापल्‍या जाणा-या नोटा वेगवेगळ्या रंगामध्‍ये व आकारामध्‍ये छापल्‍या जात असत. त्‍यामुळे या प्रकारच्‍या नकली नोटा छापल्‍या जाऊ शकत होत्या. नकली नोटांचा वापर वाढत असल्‍यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रश्‍न : हा निर्णय आरबीआयने का घेतला ?


उत्‍तर- रोख स्‍वरूपात दडवून ठेवण्‍यात आलेल्‍या काळ्या पैशावर नियंत्रण आणण्‍यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा बाजारातील चलन म्‍हणून वापरता येणार नाही व नकली नोटांचे प्रमाण कमी होईल.


पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या आरबीआय चा उद्देश .....