आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - डॉलरविरुद्ध रुपयाची घसरण सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच साठी ओलांडलेल्या रुपयाने आज (सोमवार) एकसष्ठी गाठली. रुपयाने पुन्हा ऐतिहासिक निचांकी पातळी गाठताना 61.19 हा दर नोंदविला. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र, रुपयाचा दर 61 च्यावर वरच होता.
शुक्रवारी रुपया बंद झाला त्या पातळीवरुन आज 82 पैशांची घसरण झाली. सकाळी परकीय चलनाचे व्यवहार सुरु होताच रुपयाने 61 ची पातळी ओलांडली. त्यानंतर 61.19 ही निचांकी पातळी गाठली.
काही सरकारी बँकांनी डॉलरची विक्री केली, असे काही जणांनी सांगितले. डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाची घसरण होत आहे.
न्यूयॉर्कच्या बाजारात डॉलरने गेल्या 3 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अमेरिकेच्या आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा तसेच फेडरल रिझर्व्हकडून हळूहळू आर्थिक सवलती काढण्याचे संकेत मिळाल्यामुळे डॉलर वधारला आहे. रुपयाच्या अवमुल्यनाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 271 अंकांनी घसरला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.