आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी हवी तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांविषयी अधिक माहिती नसते. साधारणत: मित्रमंडळींच्या सल्ल्याने यात गुंतवणुकीस सुरुवात केली जाते खरी मात्र मनात धाकधूक कायम असतेच. तुम्हीही नवगत गुंतवणूकदार असाल तर पुढील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल...


1. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा : कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठी हे पाहिले पाऊल आहे. केवायसीच्या अर्थ ‘नो यूवर कस्टमर’ म्हणजेच तुमच्या ग्राहकांना ओळखला असा होतो. ही माहिती देण्यासाठी प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीच्य वेबसाइटवर केवायसी फॉर्म दिलेला असतो. तसेच तो तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या कार्यालयातूनही मिळवू शकता. फॉर्मसोबत तुमचा फोटो, पॅन कार्ड आणि अ‍ॅड्रेस प्रूफच्या झेरॉक्स द्याव्या लागतात. पॅन कार्ड नसेल तर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट आदींची झेरॉक्ससुद्ध चालते. मात्र पॅन कार्ड नसल्यामुळे तुम्हाला एका वर्षात फक्त 50 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची मुभा राहील. केवायसी फॉर्मला आपल्या गुंतवणूक फॉर्मसोबत भरून कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीत जमा करता येईल.
2. बँक खाते बंधनकारक : केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुंतवणूक कुठे आणि कोणत्या स्वरूपात करायची आहे, याची निश्चिती करावी लागेल. ती म्हणजे तुम्हाला एकमुश्त गुंतवणूक करायची की, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (सिप) घ्यायचा आहे. दोन्ही पर्यायांसाठी तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. तुम्ही दुस-या व्यक्तीच्या खात्यातून गुंतवणूक करू शकत नाही.
3. अ‍ॅसेट क्लासेस जाणून घ्या : कोणत्या अ‍ॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायची आहे, याची आधी निश्चिती करावी लागेल. अ‍ॅसेट क्लासमधील जोखीम आणि परतावा याबाबत व्यवस्थितपणे माहिती घ्या. आधी आपली उद्दीष्ट्ये ठरवून घेणे हे श्रेयस्कर राहील. यातून तुम्ही गुंतवणुकीची मुदत निश्चित करू शकाल, तसेच अ‍ॅसेट क्लास काय असतो, हेही माहिती होईल. अ‍ॅसेट क्लास हे चार प्रकारचे असतात. ते म्हणजे, इक्विटी, डेट, गोल्ड आणि रिअल इस्टेट. तुमचे उद्दीष्ट, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि लिक्विडीटीनुसार त्यांची निवड करण्यात यावी. तुम्हाला अ‍ॅसेट क्लासेस अ‍ॅलोकेशनबाबतीत माहिती असेल तर याचा वापर करून फायनान्शिल प्लानिंगचा मार्ग अवलंबणे योग्य ठरेल.
4. सिप वा हायब्रिड फंडपासून करा श्रीगणेशा : नवे गुंतवणूकदार म्हणून भारंभार मोठ्या प्रमाणात खरेदी करणे फायद्याचे राहणार नाही. आपण सध्या शिकण्याच्या टप्प्यात आहोत याची जाण ठेऊन गुंतवणुकीतील बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. सिप/ट्रान्स्फर प्लानच्या माध्यमातून गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणे श्रेयस्कर राहील. शिवाय इक्विटी आणि डेटमध्ये संतुलित अ‍ॅलोकेशन असलेल्या हायब्रिड फंडमध्ये गुंतवणुकीचाही पर्याय उत्तम आहे. तुम्हाला जर अत्यंत कमी मुदतीसाठी बचत करायची असेल तर मात्र बँक डिपॉझिट किंवा शॉर्ट टर्म डेट फंडमध्ये गुंतवणुकीचा पर्याय योग्य राहील.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे, मात्र जेव्हा तुमच्या वित्तीय नियोजनाच्या आधारावर एखादे उत्पादन निवडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा संभ्रम निर्माण होतो. यात वित्तीय सल्लागाराची मदत घेण्यात काही वावगे नाही. त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला द्यावा म्हणून त्यांचे शुल्क मोजण्याची तयार मात्र ठेवावी. तुम्हाला जर म्युच्युअल फंडांची ब-यापैकी माहिती असेल तर डायरेक्ट प्लानद्वारे या क्षेत्रातील गुंतवणुकीत पाऊल टाकणे फायदेशीर राहील.


लेखक प्रमाणित वित्तीय नियोजक आणि द फायनान्शिअल प्लानर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.