आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक वित्तीय केंद्र मुंबईतच होणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक वित्तीय केंद्र मुंबईतच होणार असून येणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित ‘मुंबई नेक्स्ट : एमएमआर ट्रान्सफॉर्मेशन’ या परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘नोमुरा, जेपी मॉर्गनसारख्या वित्तीय क्षेत्रातील संस्थांनी बांद्रा कुर्ला संकुल जागतिक दर्जाचे वित्तीय केंद्र होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे ‘बीकेसी’ला जागतिक वित्तीय केंद्र बनवण्याबरोबरच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ती यंत्रणा आणि पोषक वातावरण निर्मिती करण्याचे वचनही त्यांनी दिले.

‘बीकेसी’ जागतिक वित्तीय केंद्र बनवण्याचा निश्चय पक्का असला तरी सध्याच्या घडीला या भागात सकाळ- संध्याकाळच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी सर्वच व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिषदेत सहभागी झालेल्यांनी देखील त्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावर ‘बीकेसी, कलानगर येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पालिकांना रोखे विक्री करण्याची मुभा
अडचणीत असलेल्या महापालिकांना विकासकामांसाठी रोखे विक्री करून निधी उभारण्याची मुभा फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे. राज्यातील पालिकांकडे मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च निधी उपलब्ध असला तरी त्यापैकी केवळ ३० ते ४० टक्के निधीच खर्च केला जातो असा अनुभव आहे. महापालिकांनी नियोजनबद्ध व योग्य वेळी हा निधी खर्च करावा अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या पूर्ततेनिमित्त ‘मुंबई नेक्स्ट : एमएमआर ट्रान्सफॉर्मेशन’ या परिषदेच्या समारोपात ते बोलत होते.