आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत 65 % घट, कुशमन अँड वेकफील्डचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातल्या स्थावर मालमत्ता (रिअ‍ॅल्टी) क्षेत्रातील गुंतवणूक गेल्या वर्षात 65 टक्क्यांनी घसरून 1.2 अब्ज डॉलरवर आली आहे; परंतु तरीही आशिया-प्रशांत विभागात भारताला आपले दहावे स्थान कायम राखणे शक्य असल्याचे कुशमन अँड वेकफील्ड या जागतिक पातळीवरील मालमत्ता सल्लागार कंपनीने म्हटले आहे. त्याअगोदरच्या वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात 3.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती.
रिअल इस्टेट क्षेत्रात एकूण 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक अंदाजे झाल्यामुळे आशिया-प्रशांत विभागात सर्वात जास्त गुंतवणूक होणार्‍या देशांमध्ये भारताने दहावे स्थान पटकावले आहे. आशिया प्रशांत विभागात एकूण 487 अब्ज
डॉलरची गुंतवणूक झाल्याचे कुशमन अँड वेकफील्डच्या
अहवालात म्हटले आहे.
या गुंतवणूक सर्वेक्षणामध्ये अन्य देशात चीनने सर्वाधिक 358 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली असून
त्यापाठोपाठ जपानने (तिसरे स्थान) 44.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली आहे. फिलिपाइन्स, इंडोनेशिया,
थायलंड आणि तैवान या अन्य बाजारपेठांमधील गुंतवणुकीचे प्रमाण घसरल्यामुळे भारताला दहावे स्थान कायम राखणे शक्य झाले आहे.
गेल्या वर्षी भारतामध्ये जमिनीत गुंतवणुकीचे प्रमाण सर्वाधिक 838 दशलक्ष डॉलर असून त्यापाठोपाठ कार्यालयांमध्ये 247 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली आहे; परंतु जमिनीतील गुंतवणूक 61 टक्क्यांनी आणि कार्यालयातील गुंतवणूक 77 टक्क्यांनी घटली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.