आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गडगडणारा रुपया, आपल्यावर किती भार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून भारतीय रुपयाचे मोठय़ा प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 60 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. बाजारात रुपयाच्या किमतीत चढ-उतार होत असतात, पण गेल्या काही महिन्यांपासून गडगडणार्‍या रुपयाने भारतीय अर्थतज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आपल्यावर नेमका काय आणि किती भार पडेल याचा हा वृत्तांत.

रुपयाचे अवमूल्यन आणि त्याचे परिणाम

परदेशी गुंतवणुकीत घट
विदेशी गुंतवणूकदारांना मिळणार्‍या परताव्यात घट येते. परिणामी ते गुंतवणूक करण्यास कचरतात. गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो.

कंपन्यांची अडचण : विदेशी गुंतवणुकीत घट झाल्यास आयातीवर अवलंबून असणार्‍या कंपन्यांच्या अडचणी वाढतात. त्याची उत्पादन खर्चाची किंमत वाढते. त्याच प्रमाणे इतर कामात पैशाच्या अडचणी येतात.

जास्त कर्ज फेडावे लागते : ज्या कंपन्यांनी 2008 मध्ये 39 रुपयांच्या दराने विदेशी कर्ज घेतली होती. ते 2012 मध्ये 56 रुपये दराने भागवले. आता तर डॉलरचा दर 60 रुपयांपर्यंत गेला आहे.

नोकर्‍या होतील कमी : कर्जाची परतफेड महागल्याने कंपन्यांचा खर्च वाढतो. खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांत नोकर कपातीचा पर्याय स्वीकारला जातो. यामुळे बेरोजगारी वाढते आणि स्थिती गंभीर होते.

तेलाच्या किमतीत वाढ
आपल्याला लागणार्‍या एकूण तेलापैकी 75 टक्के तेल आयात करावे लागते. काही पैशांचा फरक देखील कोट्यवधी रुपयांचा भार टाकणारा ठरतो.

महागाई वाढेल : तेलाच्या किमतीचा चलनवाढीशी थेट संबंध असतो. खासकरून डिझेलच्या किमती वाढल्या तर महागाई दरात वाढ होते.

कर्ज महाग होईल : चलनवाढ सर्वसामान्य जनतेसोबत बँकिंग क्षेत्रावर देखील परिणाम करणारी असते. यामुळे गृहकर्जासोबत इतर कर्ज देखील महाग होतात. कर्ज महाग झाल्याचा परिणाम सर्वसामान्य जनता ते औद्योगिक क्षेत्र सर्वांना सहन करावा लागतो.

बांधकाम क्षेत्र संकटात : देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा सहा टक्के इतका आहे. यावर संकट आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील.

आयात महाग
रुपया कमकुवत झाल्याने आयात महाग होते. कारण आपल्याला एक डॉलरच्या मोबदल्यात जास्त पैसे मोजावे लागतात.

वाहन : देशातील बहुतांश वाहन उत्पादक कंपन्या इतर विदेशी सहकारी कंपन्यांसोबत मिळून काम करतात. रुपया घसरल्याने गाड्यांच्या सुट्या भागाच्या किमती वाढल्याने गाड्या महाग होतील.

इलेक्ट्रॉनिक वस्तू : देशात मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात केल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांचे सुटे पार्ट देखील आयात होतात. या वस्तू महाग होतात.


खते : देशात वापरल्या जाणार्‍या एकूण खतांपैकी 50 ते 55 टक्के खते आयात केली जातात. खते महाग होणे शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरते.

औषधे : औषधे किंवा त्यात वापरले जाणारे पदार्थ मोठय़ा प्रमाणात आयात केले जातात. आयात महागल्यास औषधे महाग होणार त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...