आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reasons Of Micromax Becoming Number One Smartphone Maker In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात SAMSUNG ला मागे टाकत MICROMAX ठरले No.1, सर्वात जास्त स्मार्टफोन्सची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - मार्केट रिसर्च फर्म सीअॅनालिसिसच्या नव्या अहवालानुसार स्वदेशी स्मार्टफोन मेकर मायक्रोमॅक्सने साऊथ कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगला मागे टाकत भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. 2014 च्या शेवटच्या तिमाहीच्या आकड्यांवर आधारीत हा अहवाल 3 फेब्रूवारीला जाहिर करण्यात आला.
या अहवालानुसार, 2014 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये(ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत) मायक्रोमॅक्सच्या मोबाईल्सची एकूण विक्री 22 टक्के एवढी होती. तर दुसरीकडे सॅमसंगची विक्री ही केवळ 20 टक्के होती. या अहवालामध्ये कार्बन मोबाईलने तिसरे स्थान पटकावले आहे. 2014 च्या शेवटच्या तिमाहीत एकूण 2 कोटी 16 लाख स्मार्टफोन्स भारतीय मार्केटमध्ये विक्री गेले. हा आकडा मागिलवर्षाच्या तुलनेत 90 टक्के जास्त आहे.
कशी झाली विक्री -
2014 च्या चौथ्या तिमाहीत मायक्रोमॅक्सने 46 लाख फोन विक्री गेले. तर तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 40 लाख स्मार्टफोन विकले होते. तर दुसरीकडे तिसऱ्या तिमाहीत सॅमसंगने 44 लाख स्मार्टफोन्स विकले होते, तर चौख्या तिमाहीत सॅमसंगचा आकडा घसरून 41 लाखांवर आला आहे. तर चौथ्या तिमाहीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कार्बनने 20 लाख हँजसेट विकले आहेत. या अहवालानुसार चौथ्या तिमाहीत विकलेले जास्तीत जास्त स्मार्टफोन हे $100(जवळपास 6166.50 रुपये) पेक्षा कमी किंमतीचे होते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या...या कारणांमुळे मायक्रोमॅक्स ठरले अव्वल