आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reasons Of Petrol And Diesel Price Will Down In India

मोदी सरकारमुळे नव्हे तर या कारणांमुळे घटताहेत पेट्रोलसह डिझेलचे दर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात गेल्या साडेपाच वर्षांत जे घडले नाही ते घडत आहे, अर्थात पेट्रोलसह डिझेलच्या दरात कपात झाल्याने देशातील जनता 'अच्छे दिन'अनुभवताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलसह डिझेलच्या दरात कपात झाल्याने देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सहाजिकच देशातील जनतेने याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यात जमा आहे.
देशातील जनतेला पुन्हा एकदा खुशखबर आहे. पेट्रोल एक रुपया 75 पैसे तर डिझेल एक रुपया प्रत‍िलिटर स्वस्त झाले आहे. या पूर्वी पेट्रोलच्या दरात 2रुपये 41 पैशांनी तर डिझेलच्या दरात 2रुपये 25 पैशांनी कपात झाली होती. ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलचे दरात आठव्यांदा तर डिझेलच्या दरात चौथ्यांदा कपात झाली आहे.

महाराष्ट्र-हरियाणा दोन राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. तसेच आगामी जम्मू-काश्मिर, झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यामागचे कारण सांगितले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रुड ऑईल) दरात होत असलेली घसरण हेच पेट्रोलसह डिझेलच्या दरात कपातीमागील प्रमुख कारण म्हणता येईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पेट्रोल-डिझेल दर कपातीमागील कारणे...