आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जॉब्स\' संकटात; आर्थिक मंदीचे सावट, घटल्या रोजगाराच्या संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयाचे अवमूल्यन सातत्याने होत असून शेअर बाजारदेखील कोसळला आहे. अशा स्थितीत सर्वात जास्त दबाव आहे तो नोकर्‍यांवर. अलीकडील एका अंदाजानुसार गेल्या एक वर्षाच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रांत नोकर्‍या ठप्प झाल्या असून अनेक क्षेत्रात यात मोठी घसरण झाली आहे. नोकरी क्षेत्राशी निगडित जाणकारांनुसार 2008 च्या जागतिक मंदीच्या वेळी देखील एवढी वाईट स्थिती नव्हती. विशेष करून भारताला त्याची फार कमी झळ बसली होती. मात्र, आज स्थिती अत्यंत अनिश्चिततापूर्ण असून यासाठी भारत सरकारची धोरणे जबाबदार आहेत. जी देशाच्या आर्थिक हेतूने कमी राजकीय हेतूने जास्त चालत आहेत. पुढील वर्षी होणार्‍या सार्वजनिक निवडणुका पाहता सरकारच्या धोरणात काही बदल होईल अशी चिन्हे नाहीत. एका मासिकाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या बहुतांश सीईओंचे म्हणणे आहे की, येत्या 12 महिन्यांत स्थितीत काही सुधार होण्याची चिन्हे नाहीत. ही स्थिती फक्त भारतातच नाही तर सर्व जगभरात आहे. हॅकेट ग्रुपच्या ताज्या पाहणी अहवालानुसार युरोपीय देशात 2017 पर्यंत 19 लाख नोकर्‍यांवर गदा येऊ शकते. अमेरिकेत सध्याच स्थिती खराब आहे. परिणामी फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वच देश स्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत.

विविध क्षेत्रात कमी झालेले रोजगार
टेलिकॉम 17%
जहाजबांधणी 17%
रिअल इस्टेट 08 %
पेपर सेक्टर 23%
(रोजगार कोट्यवधींमध्ये, स्रोत : सीएमआय)

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा... 'स्थिती गंभीर होण्याची कारणे काय?'