आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Record 53000 Demat Accounts Closed In February News In Divya Marathi

डिमॅट खातेधारकांची संख्या दोन कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकीकडे शेअर बाजारात तेजी असतानाच यंदा गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते उघडण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात डिमॅट खाते उघडण्याचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी 2.18 कोटी खात्यांवर गेले आहे. हा प्रतिसाद लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी डिमॅट खाती उघडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेअर बाजाराने केले आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत फेब्रुवारीअखेपर्यंत देण्यात आलेल्या खात्यांची संख्या 2.18 कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर या खात्यांचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी वाढले आहे.

वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी 2013 पर्यंत एकूण डिमॅट खातेदारांची संख्या 2.09 कोटी होती. मासिक तुलना करता यंदा मात्र गुंतवणूकदार खातेदारांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. जानेवारी 2014 च्या तुलनेत फेब्रुवारी 2014 मध्ये एनएसडीएल व सीडीएसएलच्या खातेदारांची संख्या अनुक्रमे 0.3 व 0.2 टक्क्यांनी रोडावली आहे. जानेवारी 2013 च्या तुलनेत फेब्रुवारी 2013 मध्ये एनएसडीएल व सीडीएसएल डिमॅटधारकांची संख्या अनुक्रमे 3.8 व 5.4 टक्क्यांनी वाढली होती. मूल्याच्या बाबत फेब्रुवारी 2014 अखेर एकूण डिमॅट खात्यातील रक्कम 80 लाख कोटी रुपये राहिली आहे. वार्षिक तुलनेत त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फेब्रुवारीअखेर डिमॅट खाती :
एनएसडीएलकडे 1.30 कोटी
सीडीएसएल 87.30 लाख