आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या 'आकाश'साठी दररोज एक लाख बुकिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटरची क्रेज सतत वाढत असून दररोज एक लाख लोक टॅबलेटची बुकिंग करीत आहेत.
इंडस्ट्रीतल्या जाणकारांनी भविष्यवाणी केली होती की, २०१२ साली भारतीय बाजारात केवळ अडीच लाख टॅबलेटची गरज भासेल. परंतु टॅबलेटच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
आकाशची निर्मिती करणा-या ‘डाटाविंड’ कंपनीचे सीईओ सुनीत सिंह तुली यांच्या म्हणण्यानुसार दररोज किमान एक लाख लोक टॅबलेटची बुकिंग करीत आहेत. तुली यांनी सांगितले की, कंपनीच्या कॉल सेंटरवर दररोज हजारो कॉल्‍स येत आहेत. सर्व ग्राहकांचे समाधान करणे अवघड झाले आहे.
कंपनीकडून काहीही सांगितले जात असले तरी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत बुकिंगमध्ये घट झाली आहे. मार्चसाठीची बुकिंग अजूनही सुरु आहे.
'आकाश' मिळणार आता दुप्पट किंमतीत!
केंद्राकडून 'आकाश' प्रकल्‍प रद्द
'आकाश'साठी ऍप बनविणार्‍याला मिळणार 1 लाख रुपये