रिलायन्स कम्युनिकेशन्सचा नवा / रिलायन्स कम्युनिकेशन्सचा नवा थ्रीजी टॅब्लेट बाजारात

वृत्तसंस्था

Jul 20,2012 09:21:15 AM IST

मुंबई- रिलायन्स कम्युनिकेशन्सने अँड्रॉईड तंत्रावर चालणारा नवा 3जी टॅब्लेट बाजारात दाखल केला आहे. 3जी आणि सीडीएमए तंत्रज्ञानावर आधारलेला पहिलाच टॅब्लेट असून त्याची किमत 14,499 रुपये आहे. ऑगस्टपासून हा नवीन टॅब बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
स्वस्त किंमत आणि अनेक नव्या सुविधा असलेल्या या टॅब्लेटमध्ये अँड्रॉईड 2.3 ओएस तंत्रावर आधारित रिलायन्स 3जी टॅबचा स्क्रीन 7 इंची कॅपॅसिटीव्ह टच आहे. त्याच्या प्रोसेसरचा वेग 1.4 गिगाहट्र्झ आहे. स्क्रीनचे रिझॉल्यूशन 1024 बाय 600 असून त्यात 512 एमबी रॅम आहे. रिलायन्स 3जी टॅबचे वजन अवघे 402 ग्रॅम आहे. कॅमेरा मागे आणि पुढे अशा दोन्ही बाजूस असून त्याची मेगपिक्सेल क्षमता 3.0 आहे. यामुळे व्हिडिओ कॉल करता येईल. रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीने आपल्या 3जी ग्राहकांना 6250 रुपये किमतीचे मोफत लाभ देखील देऊ केले आहेत.

X
COMMENT