आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची‘मेक इन इंडिया’ची हाक उद्योगजगताला भावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र: मेक इन इंडियाच्या सादरीकरणात सहभागी झालेले उद्योजक मुकेश अंबानी व राजकुमार धूत.)
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘भारतातच बनवा’ अर्थात ‘मेक इन इंडिया’ची हाक उद्योगजगताला मनापासून भावली आहे. या मोहिमेचे स्वागत करतानाच उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी स्थिर कर रचना, कामगार कायद्यात सुधारणा आणि झटपट निर्णयक्षमता यामुळेच ही मोहीम ख-या अर्थाने अस्तित्वात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा समूहाचे प्रमुख सायप्रस मिस्त्री, आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह अनेक उद्योगपतींनी देशातील उत्पादन क्षेत्राचे चाक गतिमान वाढीने कार्यरत झाले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि सर्वाधिक वाढ शक्य होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.

गावांचे क्लस्टर जोडावे
* ही मोहीम यशस्वी करायची तर संपूर्ण जगभरातून भांडवल आणि तज्ज्ञांच्या दृष्टीने खुली भूमिका हवी. जीएसटीच्या अंमलबजावणी भारताला एककेंद्रित बाजारपेठ आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाला बळकटी मिळू शकेल. रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील १२ ते १५ महिन्यांत १.२५ लाख रोजगार निर्मिती करणार आहे. यशोगाथेची कमान कायम ठेवायची तर गावांना जोडणेही तितकेच महत्त्वाचे असून त्यासाठी गावांचे क्लस्टर आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडले गेले पाहिजे.
मुकेश अंबानी,अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज

गुंतवणूक वाढणार
* पंतप्रधानांच्या या मोहिमेमुळे माझा गुंतवणूक आत्मविश्वास आणि गुंतवणुकीचा वेगही वाढण्यास मदत होणार आहे. अमित कल्याणी, कार्यकारी संचालक, भारत फोर्ज
स्थिर धोरण हवे
* काही आव्हानांना प्राधान्य दिल्यास जागतिक पातळवरील उत्पादन केंद्र होण्याची मनीषा पूर्ण होईल. स्थिर धोरणांसह देशभरात प्रमुख पायाभूत सुविधांची उभारणी, पारदर्शक आणि स्पर्धात्मक कर आणि शुल्क रचना, सक्षम प्रशासन, ई गव्हर्नन्स, वाजवी आणि विश्वासार्ह ऊर्जा या गोष्टींची जोड द्यायला हवी. सायप्रस मिस्त्री, प्रमुख, टाटा समूह