आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - तिस-या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे प्रतिबिंब सोमवारी दलाल स्ट्रीटवर दिसले. त्यातच युरोपातील बाजारांनी सकारात्मक संकेत दिल्याने मुंबई शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. सेन्सेक्सने सलग तिस-या सत्रात 63 अंकांची कमाई करत 20,101.82 हा दोन वर्षांतील नवा उच्चांक गाठला. निफ्टीनेही 17.90 अंकांच्या कमाईसह 6,082.30 ही पातळी गाठली.
युरोपातील सकारात्मक संकेत आणि विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीचा ओघ कायम असल्याने बाजारात तेजी दिसून आली. आशियाई बाजारातील नरमाईने सेन्सेक्सच्या तेजीला वेसण बसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. तिस-या तिमाहीत कंपन्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचाही बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात 2.35 टक्के तेजी आली. रिलायन्समधील तेजीने सेन्सेक्सच्या वाढीत 40 अंकांची भर टाकली. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत रिलायन्सने गेल्या चार तिमाहींतील तोट्याची साथ सोडत नफ्याची कास धरली. त्यामुळे हा समभागाच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये रिलायन्सने 954.80 चा वर्षभरातील उच्चांक गाठला. विदेशी संस्थांनी शुक्रवारी 1165.69 कोटींची खरेदी केली.
टॉप गेनर्स
भेल, एल अँड टी, मारुती सुझुकी,भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅब, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल इंडिया.
टॉप लुझर्स
सन फार्मा, टाटा मोटर्स, टीसीएस, सिप्ला, कोल इंडिया, एचडीएफसी बँक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.