आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Infra And Aap Court Case News In Marathi

\'रिलायन्स इन्फ्रा\'तर्फे \'आप\'विरोधात मुंबई हायकोर्टात मानहानीचा खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'ने आम आदमी पक्षाविरोधात (आप) मानहानीचा खटला दाखल केला आहे. रिलायन्सने मुंबई हायकोर्टात 100 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी कोर्टाने 'आप'च्या तीन नेत्यांना नोटिसही बजावली आहे.

'रिलायन्स इन्फ्रा' आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमईआरसी) याच्यात साटंलोटं असल्याचा आरोप 'आप'ने केला होता. या कामात एमईआरसीने 'रिलायन्स इन्फ्रा'ची मदत करत असल्याचेही 'आप'च्या नेत्या अंज‍ली दमानिया यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी न्यायमूर्ती एस.जे.काठावाला यांनी 'आप'च्या तीन नेत्यांना नोटीस बजावली आहे. यात अंजली दमानिया, प्रीति शर्मा मेनन आणि सतीश जैन यांचा समावेश आहे. याप्रकरणी येत्या सात मार्चला सुनावणी होणार असून तिघांना सात मार्च रोजी कोर्टात उपस्थित राहाण्याचेही आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या मंगळवारी हायकोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीला 'आप'चे नेता उपस्थित नव्हते. त्यामुळे कोर्टाने तिघांना नोटीस बजावली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'आप'च्या नेत्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप'