आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance MF Gets Tax Department Nod For Pension Scheme

रिलायन्सच्या पेन्शन फंडाला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यामुळे रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा समभागांशी निगडित पेन्शन योजना बाजारात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुंतवणूकदारांना कर लाभ देणारी ही पहिली पेन्शन योजना ठरणार आहे.

प्राप्तिकर कायद्यांतर्गत आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करून कर वजावटीचा लाभ देणारी रिलायन्स रिटायरमेंट फंड या नावाने पेन्शन फंड आणण्यासाठी सरकारने रिलायन्सला अध्यादेशाद्वारे कळवले आहे. समभागाशी निगडित पर्याय असलेला हा पहिला पेन्शन फंड असून महागाईशी मुकाबला करताना गुंतवणूकदारांना स्पर्धात्मक परतावा मिळणे यामुळे शक्य होणार आहे.

आतापर्यंत केवळ दोन फंड हाउसेसना पेन्शन योजना मिळण्याची परवानगी मिळालेली असली तरी ती केवळ कर्जाशी निगडित योजना आहे. त्याशिवाय यूटीआय आणि फ्रँकलिन टेम्प्लेटन एमएफ या दोन्ही फंडांनादेखील १५ वर्षांपूर्वीच पेन्शन फंड आणण्याची परवानगी मिळाली आहे.

फंडांच्या पेन्शन उत्पादनांसाठी मसुदा योजना तयार करण्यात यावी, अशी सूचना बाजार नियंत्रक सेबीने म्युच्युअल फंड सल्लागार समिती आणि अ‍ॅम्फी या संस्थेला केली आहे. त्याच वेळी रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंटला पेन्शन फंड आणण्याची परवानगी मिळालेली आहे. सध्याच्या पेन्शन उत्पादनात विमा कंपन्यांप्रमाणे कर लाभ देण्यात येत नाही.