आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सचा नफा घसरला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । रिफायनरी आणि पेट्रोरसायन व्यवसायातील नफ्याचे प्रमाण घटल्यामुळे खासगी क्षेत्रातील अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 15.3 टक्क्यांनी घसरून 4,440 कोटी रुपयांवर आला आहे.
कंपनीच्या व्यवसायाचे जागतिक पातळीवरील स्वरूप आणि अर्थव्यवस्थेतील नरमाई याचा परिणाम कंपनीच्या तिमाहीतील नफ्यावर विशेष करून रिफायनरी आणि पेट्रोरसायन व्यवसायावर झाला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजची तिसºया तिमाहीतील उलाढाल 40.2 टक्क्यांनी वाढून ती वार्षिक आधारावर 87.480 कोटी रुपयांवर गेली आहे. 31 डिसेंबरअखेर संपलेल्या नऊमाहीमध्ये कंपनीची उलाढाल 37.4 टक्क्यांनी वाढून ती 251,958 कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीकडे 31 डिसेंबरअखेर संपलेल्या कालावधीत थकीत कर्जाचे प्रमाण अगोदरच्या 67,397 कोटी रुपयांवर गेले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रतिसमभाग 870 रुपये याप्रमाणे समभाग फेरखरेदी योजनेला मंजुरी दिली आहे. शुक्रवारच्या कंपनीच्या समभाग बंद किमतीनुसार अधिमूल्य 9.66 टक्के आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 12 कोटी समभागांची खरेदी करण्यासाठी 10,440 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

म्युच्युअल फंड आणि सरकारी रोख्यांमध्ये 73,539 कोटी रुपयांची रोख आणि समतुल्य रोख असल्यामुळे निव्वळ आधारावर कंपनी कर्जमुक्त आहे.
समभागांची फेरखरेदी करणार कंपनीचे रिफायनरीमधील ढोबळ नफ्याचे प्रमाण तिमाहीमध्ये बॅरलमागे 6.8 डॉलरने घसरले आहे. त्या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत ते प्रतिबॅरल 9.0 डॉलरने घसरले होते.