Home | Business | Share Market | reliance securities fine of 25 lakh

रिलायन्स सेक्युरिटीज भरणार 25 लाखांचा दंड

agency | Update - Jun 10, 2011, 01:30 PM IST

अनिल अंबानींच्या रिलायन्स सेक्युरिटीजने केलेल्या अधिनियम उल्लंघनांच्या प्रकरणात आज कंपनीने 25 लाख रुपये भरण्याची तयारी आहे.

  • reliance securities fine of 25 lakh

    अनिल अंबानींच्या रिलायन्स सेक्युरिटीजने केलेल्या अधिनियम उल्लंघनांच्या प्रकरणात आज कंपनीने 25 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर बाजार नियामक प्राधिकरण सेबीने काही अटी घालून कंपनीविरोधातील चौकशी मागे घेतली आहे.

    सेबीन घातलेल्या अटींनुसार रिलायन्स सेक्युरिटीजला पुढील 45 दिवसांत कोणत्याही नवीन ग्राहकाची नोंदणी करता येणार नाही तसेच कंपनीला गुंतवणूक जागरुकतेसाठी एक कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. ब्रोकर संस्थाची आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात एप्रिल 2007 ते मार्च 2009 दरम्यान सेबीने रिलायन्स सेक्युरिटीजची चौकशी केली.

    या चौकशीत रिलायन्स सेक्युरिटीच्या खातेपुस्तिकांत विविध अनियमता आढळून आल्या असल्याचे सेबीने म्हटले आहे. यात शाखा कार्यालयाचा कागदोपत्री पुरावा नसणे, अतिरिक्त सेक्युरिटीज व्यवहार कर वसूल करणे, रिलायन्स मनीच्या नावे (दुसर्‍या समूहातील कंपनी) धनादेश घेणे अशा विविध अनियमितता आढळून आल्या.

    कंपनीने मात्र ही तडजोड कोर्टाबाहेरील तडजोडीसारखी असल्याचे सांगून यात दोष स्वीकारलेलाही नाही किंवा नाकारलेला नाही असे म्हटले आहे. यापूर्वी जानेवारीतही रिलायन्स इन्फ्रा आणि आरएनआरएलने अनुचित बाजार सौद्यांच्या आरोपांवरून सेबीसोबत 50 कोटींची तडजोड केली आहे. याशिवाय या दोन्ही कंपन्यांना सन 2012 पर्यंत दुय्यम बाजारात गुंतवणूक करता येणार नाही.

Trending