Home | Business | Share Market | relience, r com take loan 6 k, business

रिलायन्स इन्फ्राटेलसाठी प्रस्ताव मिळाले - आरकॉम

agency | Update - Jun 01, 2011, 02:38 PM IST

रिलायन्स कम्युनिकेशनची उपकंपनी रिलायन्स इन्फ्राटेल लिमिटेडच्या भागभांडवलातील वाटा मिळवण्यासाठी कंपनीला विविध प्रस्ताव मिळाले आहे. त्यामुळे कंपनीवरील प्रचंड कर्ज कमी व्हायला मदत होणार आहे, अशी माहिती आज अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी 'आरकॉमकडून देण्यात आली.

 • relience, r com take loan 6 k, business

  रिलायन्स कम्युनिकेशनची उपकंपनी रिलायन्स इन्फ्राटेल लिमिटेडच्या भागभांडवलातील वाटा मिळवण्यासाठी कंपनीला विविध प्रस्ताव मिळाले आहे. त्यामुळे कंपनीवरील प्रचंड कर्ज कमी व्हायला मदत होणार आहे, अशी माहिती आज अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी 'आरकॉमकडून देण्यात आली.

  आलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यास कंपनीच्या मंडळाने मान्यता दिली आहे. हा फक्त प्राथमिक खुलासा असून, संभाव्य व्यवहार योग्य त्या वाटाघाटी, दस्तएेवजीकरण आणि मंजुरीच्या अधीन आहे, असे कंपनीने गुंतवणूकदारांना सूचित केले आहे. चालू वित्तीय वर्षात कंपनीने चीनच्या सीडीबी बँकेकडून ६,000 कोटींचे कर्ज घेतले आहे.

  चिनी विक्रेत्यांकडून दूरसंचार साधनांची आयात तसेच घरगुती खर्चासाठी आरकॉमने सीबीडीकडून २७00 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे. हे स्पेक्ट्रम शुल्कापोटीच्या वित्तसाहाय्याचे आजवरचे सर्वात मोठे कर्ज आहे. या एकूण ८,७ ooकोटी रुपयांच्या कर्जाचा परिपक्वता कालावधी १0 वर्षांचा असून, त्यामुळे आरकॉमची कर्ज परिपक्वता घडण महत्त्वपूर्णपणे विस्तारली आहे.

  आरकॉमच्या शेअर्सला १.५४ टक्क्यांच्या वाढीसह 88.85 रुपयांचा भाव तर, मार्चच्या अखेरीस आरकॉमवरील कर्ज 32,048.5 कोटी रुपये होते.
  ......................

Trending