आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेंज रोव्हर स्पोर्ट सुपरचार्ज्ड कार वजनाला हलकी, उत्कृष्‍ट इंटेरिअर, जबरदस्त वेग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लँड रोव्हर रेंजमधील स्पोटर्स कारमध्ये रेंज रोव्हरचे नाव येते. आता त्याचे नवे व्हर्जन त्याला नवा अर्थ देत आहे. जुन्या ट्विन स्टील रेल चेसिसऐवजी या वेळी त्यात अ‍ॅल्युमिनियम मोनोकॉक चेसिस आहे. सोबतच त्याच्या सस्पेन्शनमध्येही बदल करण्यात आला आहे. या स्पोर्ट्स कारचे एक्स्टीरियर मोठी कार लँडरोव्हरच्या तुलने अधिक विस्तारित आहे.


या कारची जमिनीपासूनची उंची खूपच कमी आहे. नव्या बदलानंतरही गाडीचे वजन 45 किलोग्रॅमने कमी आहे. त्यामुळे या मॉडेलच्या गाडीचा वेग वाढवणा-या कारणांमध्ये या बाबीचा समावेश आहे. या गाडीचे एअर सस्पेन्शन नव्याने डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळेही गाडीची लांबी- रुंदी काही प्रमाणात वाढवावी लागली. या कार मॉडेलमधील डिफरन्शियल लॉकिंग सिस्टिम अधिक प्रगत असून ते आधीपेक्षा 30 टक्के वेगाने काम करू शकते. कंपनीने गाडीच्या आतील सजावटीवरही विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे गाडीच्या अंतरंगाला आधीपेक्षा वेगळा लूक मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गाडीच्या थर्ड रोमध्ये दोन पॉवर असिस्टेड किड्स सीट्स आहेत. गरजेनुसार त्या फोल्ड करता येतात.


या मॉडेलचे इंजिन दोन श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पहिले इंजिन 288 बीएचपी व दुसरे 503 बीएचपीचे आहे. सुपरचार्ज व्ही 8 पेट्रोल मॉडेल आहे. केवळ पाच सेकंदात ही गाडी ताशी 100 किलोमीटरचा वेग घेऊ शकते. या मॉडेलचा निम्म्यापेक्षा जास्त भाग रिसायकल अ‍ॅल्युमिनियमपासून बनवला आहे. याची साइड बॉडी प्रेसिंग इतर कुठल्याही कारच्या तुलनेत सर्वात मोठी आहे.


फीचर: रेंज रोव्हर स्पोर्ट सुपरचार्ज्ड
* इंजिन- व्ही8, 4999सीसी सुपरचार्ज्ड, पेट्रोल
* पॉवर- 503 बीएचपी @ 6000 आरपीएम
* टॉर्क- 63.7 किलो@ 2500 आरपीएम
* गिअरबॉक्स- 8- स्पीड ऑटोमॅटिक
* टायर - 275/45 आर 21