आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातच नव्हे, तर युरोपातही धूम करत आहे डस्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात आल्यापासून डस्टरने विक्रीतील यशाचे अनेक विक्रम स्थापन केले आहेत. आपला रग्ड लूक, साधेपणाचा मिलाफ आणि डिझेलची बचत करणारे इंजिन यामुळे डस्टरने भारतीयांची मने जिंकली आहेत. मात्र, डस्टरचे दिवाने केवळ भारतातच नाहीत, युरोपातही डस्टरने धमाका केला आहे. युरोपातील बाजारपेठांत सध्या मंदी आहे. युरोपियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ऑटो विक्रीच्या आकड्यांनुसार युरोपातील वाहन विक्रीत यंदाही घसरण होणार आहे. मात्र, डस्टरची पालक कंपनी डाचियाने युरोपातील या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवला आहे. युरोपातील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड म्हणून समोर आली आहे.
यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत मागील एक वर्षात 2,60,000 डाचियाची विक्री झाली आहे. अगोदरच्या एक वर्षाच्या विक्रीच्या तुलनेत विक्रीत 21.1 टक्के वाढ झाली आहे. कोणत्याही ब्रँडच्या विक्रीपेक्षा हे जास्त आहे. दुसºया स्थानावर असलेल्या माजदा आणि जग्वारपेक्षा डाचिया खूपच पुढे गेली आहे. या दोन्ही ब्रँडची विक्री अनुक्रमे 15.6 तसेच 15.6 टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात डाचियाने बाजारातील आपला हिस्सा 2012च्या 1.9 टक्क्यांनी वाढून 2013 मध्ये 2.4 टक्क्यांवर नेला आहे. फ्रान्समधील कारनिर्मिती करणारी रेनॉची डाचिया ही सबसिडरी कंपनी आहे.
डाचियाच्या यशामागची कारणे भारतीयांना चांगलीच माहिती आहेत. डाचियाची पालक कंपनी रेनॉने भारतात सर्वप्रथम लोगन ही कार सादर केली होती. मात्र, ग्राहकांकडून कमी प्रतिसाद मिळालेली ही कार सध्या महिंद्रा व्हेरिटो या नावाने बाजारात उपलब्ध आहे, तर दुसरी कार डस्टरने सर्वांची मने जिंकली आहेत.
परफॉर्मन्स कार म्हणून डाचियाला कार शौकिनांची कमी पसंती असेल. मात्र, कारला प्रवासाचे माध्यम मानणारे डाचियावर फिदा आहेत. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी या कारमधून जाणे त्यांना चांगले वाटते. डाचियामध्ये सुलभ आणि विश्वसनीय तंत्रज्ञान त्यांना लाभते. तसेच तीन वर्षांची वॉरंटीही मिळते, जी या कारधारकांची गरज आहे.
कारभारातील वैविध्यात डाचियाचे यश दडले आहे. बाजारात मंदी असतानाही डाचियाच्या लो-एंड तसेच लक्झरी कार चांगली कामगिरी करत आहेत. स्पर्धक कंपन्या मात्र मंदीशी झगडत असताना डाचियाने रेनॉचा नफा खाली उतरू दिलेला नाही.
रेनॉच्या एंट्री लेव्हल सेगमेंटचे जागतिक प्रमुख अरनॉड डेबॉक यांनी सांगितले, प्रत्येक जण आम्ही परिस्थितीचा लाभ उचलल्याचे सांगतो. मात्र, युरोपातील ग्राहकांच्या कार खरेदीच्या मानसिकतेत बदल झाला आहे. कार खरेदीसाठी जास्त पैसे खर्चण्यास सध्या हे ग्राहक तयार नाहीत. डाचियाचे यश पाहून निस्साननेही आपला डॅटसन हा बजेट ब्रँड रिव्हाइव्ह केला आहे. लवकरच भारतीय बाजारात ही कार दिसेल. ऑटो क्षेत्रातील अफवांवर विश्वास ठेवला, तर फोक्सवॅगन आणि फियाटही आपल्या स्वस्त श्रेणीच्या कार बाजारात आणणार आहे.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.