आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची विक्री वाढवण्यासाठी रेनॉल्टकडून ‘डस्टर’नंतर रेनॉ स्काला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘डस्टर’च्या शानदार बुकिंगनंतर फ्रान्सची ऑटो कंपनी रेनॉल्ट आता देशातील आपली बाजारपेठ आणखी तगडी करण्याच्या प्रयत्नात लागली आहे. कंपनीने भारतातील विक्री एक लाख वाहनांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे. रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क नसीफ म्हणाले, 2013-14 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. यासाठी रेनॉल्ट इंडियाने चांगला प्रॉडक्ट प्लानही आखला आहे. गेल्या वित्तवर्षात रेनॉल्टने 4000 वाहने विकली होती. चालू वित्तवर्षात विक्रीचा आकडा 40 हजारांवर पोहोचण्याची कंपनीची अपेक्षा आहे. रेनॉल्टने भारतात आतापर्यंत चार मॉडेल्स लाँच केली आहेत. नुकत्याच सादर झालेल्या डस्टरबाबत मार्क नसीफ यांनी चांगल्या विक्रीची अपेक्षा व्यक्त केली आहे. विक्री वाढवण्यासाठी रेनॉल्ट दिवाळीत मिड-साइझ सेडान आकारातील ‘स्काला’ ही कार उतरवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रेनॉल्ट इंडियाची भारतातील सहकारी कंपनी निस्सानची कार ‘सनी’सारखाच चेहरामोहरा स्कालाचा असेल. स्कालामध्ये सनीपेक्षा अधिक आकर्षक फीचर्स आणि सुविधा असतील, असा अंदाज आहे. यामुळे निस्सान सनीपेक्षा स्कालाची किंमतही अधिक असू शकते.
रेनॉ स्कालावर एक नजर
- स्कालाचे लुक्स हुबेहूब निस्सानच्या सनीसारखे आहेत. एक्सटिरिअरमध्ये काही बदल होतील.
- गाडीत 1.5 लिटर पेट्रोल (97 बीएचपी/134 एनएम) आणि 1.5 लिटर डीसीआय (85 बीएचपी/200 एनएम) इंजिन बसवलेले असेल.
- 5 स्पीड गिअर बॉक्सयुक्त ही कार आधी मॅन्युअल लाँच होईल.
- स्कालाची किंमत 6 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.