आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Repo And Crr Cut By 0.25 Percent: Rbi Declear Its Third Quarter Monatary Policy

रेपो व रोख राखीव निधीत 0.25 टक्‍क्यांनी कपात :रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तिस-या तिमाहीचे पतधोरण मंगळवारी जाहीर केले. त्यात रेपो व रोख राखीव निधी (सीआरआर) यात प्रत्येकी 0.25 टक्के कपात करण्यात आली. रेपो दर आता 7.75 टक्के, तर सीआरआर 4 टक्के झाला. मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आरबीआयचे गर्व्हनर डी. सुब्बाराव यांनी सांगितले.

बँकिंग, औद्योगिक, रिअ‍ॅल्टी क्षेत्रातूनही आरबीआयच्या धोरणाचे स्वागत झाले. आरबीआयच्या रेपो दरातील कपातीनंतर सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपातीचे संकेत दिले.