आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो रेटमध्ये कपातीची अ‍ॅसोचेमची मागणी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक सुस्तीच्या पार्श्वभूमीवर उद्योगजगातील अग्रगण्य संघटना अ‍ॅसोचेमने रेपोरेटमध्ये 100 आधारभूत अंकांची कपात करण्यासह अनेक वित्तीय सुधारणेच्या सूचना रिझर्व्ह बँकेकडे केल्या आहेत. अ‍ॅसोचेमचे अध्यक्ष राजकुमार धूत यांनी शिष्टमंडळासह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची भेट घेत कठोर आर्थिक धोरणामुळे वृद्धीवर परिणाम होत असल्याचे म्हटले.
याशिवाय अनेक मुद्द्यांवरही अ‍ॅसोचेमने आरबीआयला विविध उपाय सुचवले आहेत. विदेशी वाणिज्य कर्जाच्या नियमात आणखी शिथिलता आणण्याची विनंती अ‍ॅसोचेमने केली आहे. बँकिंग क्षेत्रात तरलतेची चणचण भासत आहे. यामुळे बँकांना म्युच्युअल फंड आणि विमा व्यवसायावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्येही 100 आधारभूत अंकांची कपात करावी, परिणामी बाजारात भांडवल उपलब्ध होईल, असे अ‍ॅसोचेमने सुचवले आहे.
महागड्या दरातील कर्जामुळे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला (एसएमई) मोठा फटका बसत आहे. यामुळे या उद्योगातील अनुत्पादक मालमत्ता वाढत असून क्षेत्राला व्याजात दोन टक्के सवलत देण्याचीही मागणीही करण्यात आली आहे. कंपनीच्या नेटवर्थशी विदेशी वाणिज्य कर्ज मर्यादेचा संबंध घालण्यात येऊ नये, असेही अ‍ॅसोचेमने म्हटले आहे.