आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक यूजर फ्रेंडली बनवणारा नायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायरलेस माऊसचाही वापर सध्या होत आहे. परंतु विंडोज आणि कॉम्प्युटर यांच्यात सहज लिंकिंग म्हणून माऊसची निर्मिती झाली. अन् संशोधन कार्यात वापरला जाणारा कॉम्प्युटर व्यवहारिक, वैयक्तिक जीवनाचा भाग बनला आहे.
स्वप्नं अनेकजण पाहतात. परंतु नवनव्या कल्पना आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणं हे आव्हानात्मक असते. नावीन्यता ज्यांच्या जगण्याचा भाग बनला होता असे डग्लस एंगेलबर्ट यांनी कॉम्प्युटर क्षेत्रात विविध स्तरांवर संशोधन केले.
कॉम्प्युटर तंत्र हाताळणी म्हणजे संशोधक आणि कॉम्प्युटर इंजिनीअर यांचीच काहीकाळ मक्तेदारी होती. परंतु संशोधनात कायम गुंतवून घेणा-या एग्लबर्ट यांनी ‘माऊस’ला जन्म दिला आणि कॉम्प्युटर यूजर फ्रेंडली बनला.


1960 मधील पहिला लाकडी माऊस
1960 ला बनवलेला हा पहिला माऊस. त्या काळात संगणक मोठ्याला खोल्यांच्या आकाराचे होते. डग्लस यांचा पेटेंट एकूण 1987 ला संपले. त्यामुळे त्यांना फारसा आर्थिक फायदा झाला नाही. कारण, तोपर्यंत संगणकाचा आणि माऊसचा वापर मर्यादित होता. त्याच्यानंतर माऊसचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.


पेटंट मिळवण्यासाठी दहा वर्षे
1960 च्या दशकात ‘माऊस’ला त्यांनी जन्म दिला. लाकडी आवरण आणि मेटलच्या दोन फिरक्यांचा वापर करून त्यांनी माऊस बनवला. कॉम्प्युटर विश्वात त्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाने क्रांती झाली. कॉम्प्युटर हाताळणी फ्रेंडली झाली. माऊसचा जन्मदाता म्हणून डग्लस एंगेलबर्ट यांचे त्यावर नाव कोरले. परंतु त्यांना त्याचे पेटंट घेण्यासाठी बराच काळ लागला. 1970 च्या दशकात त्यांना माऊसचे पेटंट मिळाले. परंतु त्यामधून संपत्तिकदृष्ट्या अधिक उपयोग झाला नाही. त्यांनी माऊसपूर्वीच 45 पेटंट मिळवलेले होते.


दूरदृष्टीचा संशोधक
इंटरनेट, ई-मेल सेवेची कल्पनादेखील एंगेलबर्ट यांनी प्रथम मांडली होती. एंगेलबर्ट यांच्या कल्पनेनंतर दशकभराने इंटरनेट, ई-मेल सेवा बाजारपेठेत प्रत्यक्षात आली. इतर संशोधकांसोबत त्यांनी अनेक मूलभूत प्रकल्पात सहभाग घेतला होता. त्यात डिस्प्ले एडिटिंग, ऑन-लाइन प्रोसेसिंग, लिंकिंग, विविध विंडोंचा एकाच वेळी वापर, हायपर मीडिया अशा महत्त्वाच्या प्रक्रिया विकसित करण्यात एंगेलबर्ट यांचा खारीचा वाटा राहिला आहे.