आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रिझर्व्ह बँकेने आज व्याजदरात पाव टक्क्यांची कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा असून गृहकर्ज धारकांना दिलासा मिळू शकेल.
रिझर्व्ह बँकेने आज तिमाही पतधोरणाचा आढावा घेतला. त्यानंतर अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदारात 0.25 टक्के कपात केली. तसेच राखीव रोख प्रमाणातही 0.25 टक्के कपात केली. सीआरआरमध्ये कपात केल्यामुळे 18 हजार कोटी रुपये रोख उपलब्ध होतील. परंतु, विकासदराचा अंदाज आरबीआयने घटविला असून 5.8 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांवर विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या तिमाही आढव्यात आरबीआयने व्याजदरात कपात केली नव्हती. त्यावेळी कपातीची अपेक्षा होती. यंदा मात्र आरबीआयने कपात केली. काही दिवसांपूर्वी अर्थ्यामंत्र्यांनी व्याजदर कपातीला वाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्याजदर कपातीनंतर गृहकर्जावर एका लाखासाठी दरमहा 16 रुपये कमी ईएमआय भरावा लागेल, असा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.