आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank News In Marathi, Divya Marathi, Credit Card

क्रेडिट कार्डसाठी दोनदा खातरजमा होणार, रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन खरेदी व्यवहार केल्यास दोन वेळा खातरजमा (व्हेरिफिकेशन) करण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) स्पष्ट केले. क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या ऑनलाइन व्यवहारासाठी आता दोनदा खात्री करण्यात येणार असून दुसऱ्या वेळी पासवर्ड किंवा कार्डवर नमूद नसणारी तत्सम माहिती भरण्याची सूचना होणार आहे. ही माहिती भरल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

याशिवाय देशात जारी करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डच्या रकमा रुपयात देता येतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. मात्र ही रक्कम कोणत्या तरी बँकेच्या माध्यमातून भरणे आवश्यक आहे. तसेच भारतातील देणी फेडण्यासाठी इतर देशाच्या चलनाचा वापर करणे फेमा कायद्याचे उल्लंघन ठरेल, असा इशारा िरझर्व्ह बँकेने िदला आहे. अशा आशयाचे निर्देश आरबीआयने यापूर्वीही दिले होते, मात्र त्याचे पालन न झाल्याने नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश तत्काळ लागू झाले असून यापूर्वी झालेल्या व्यवहारांबाबत काही वाद झाल्यास त्याच्या पूर्ततेसाठी ३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत मुदत िदली आहे.