आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank News In Marathi, Home Loan Installment, Divya Marathi

होमलोनचा हप्ता 10 टक्क्यांनी स्वस्त होणार, रिझर्व्ह बँकेने वाजवी घरांसाठी नियम केले शिथिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाजवी दरातील गृहप्रकल्पांना गती मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना रोख्यांच्या माध्यमातून दीर्घकालीन निधी उभा करण्याची मुभा दिली आहे. यामुळे अशा प्रकारचे गृहप्रकल्प निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) 8 ते 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे मत केपीएमजीने व्यक्त केले आहे.

पायाभूत तसेच परवडणा-या घरांच्या क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बाजारातून उभारलेला पैसा या दोन क्षेत्रांतील प्रकल्पांना निधी पुरवठ्यासाठी वापरल्यास रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोकडसुलभता प्रमाण यांसारख्या बंधनकारक नियामक नियमांमधून दीर्घकालीन रोख्यांना वगळण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतला आहे.

कर्जदारांना दिलासा
रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे गृहकर्जदारांना चांगला फायदा होईल, असे मत केपीएमजीचे भागीदार नीरज बन्साळी यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले, यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता 8 ते 10 टक्क्यांनी स्वस्त होईल.

फायदा काय
महानगरे वगळता इतर ठिकाणी सध्या 20 लाख रुपयांची घरे वाजवी किंवा प्राधान्य श्रेणीत यायची. त्यामुळे त्यासाठीच्या गृहकर्जावरील व्याजदर तुलनेने कमी असायचे. आता 50 लाखांपर्यंतची घरे या श्रेणीत आल्याने फायदा होणार आहे.

किती कर्ज मिळणार
सहा महानगरे वगळून इतर ठिकाणी 50 लाख रुपये किमतीच्या घरांसाठी 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल.

वाजवी दरातील घर नेमके काय
वाजवी दरातील किंवा प्राधान्य घराची (अफॉर्डेबल हाऊस किंवा प्रायोरिटी ) व्याख्या रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केली आहे. वैयक्तिक निवासासाठी 50 लाख रुपयांपर्यंतची घरे तसेच सहा महानगरांतील 65 लाख रुपयांपर्यंतची घरे यात समाविष्ट आहेत. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा महानगरांचा यात समावेश आहे.