मुंबई - खाणकाम, वस्त्र, इंधन, अभियांत्रिकी आणि पायाभूत क्षेत्रातील मागणीचे प्रमाण घटल्याचा बॅँकांकडून उद्योगांना देण्यात येणा-या कर्जावर परिणाम झाला आहे. यंदाच्या मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात उद्योगांना देण्यात येणा-या कर्ज पुरवठ्याचे प्रमाण 13.1 टक्क्यांनी वाढून 25.23 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. खाणकाम, वस्त्र, लाकूड आणि लाकडाची उत्पादने, पेट्रोलियम आणि कोळसा उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, काच आणि काचेची उत्पादने, सिमेंट आणि सिमेंट उत्पादने, अभियांत्रिकी, हिरे आणि अलंकार, पायाभूत आदी विविध क्षेत्रांतील कर्ज वाढीचे प्रमाण घसरले असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘क्षेत्रीय बँक कर्ज पुरवठा’ अहवालामध्ये म्हटले आहे.