आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने तारण कर्जावरील मर्यादा शिथिल; रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुवर्ण अलंकारांच्या तारणाच्या बदल्यात बँकांकडून मंजूर करण्यात येणार्‍या कर्जावरील मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने 30 डिसेंबरला सोन्याच्या दागिन्यांच्या तारणाच्या बदल्यात एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याबाबत बँकांवर मर्यादा घातल्या होत्या.

बिगर शेतीत वापरासाठी तारण ठेवण्यात येणार्‍या सोन्यावरील कर्ज मर्यादा बॅँकांना आता त्यांच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार निश्चित करता येणार आहे. सोने तारणाच्या कर्ज रकमेची मर्यादा वाढवावी याबाबत सराफा व्यावसायिकांनी विनंती केली होती. त्याचप्रमाणे या कर्जाचा कालावधी संपल्यानंतर व्याज आणि मुद्दल हे दोन्ही देय असल्यामुळे या कर्जाला लागू असलेल्या अन्य अटींचादेखील आढावा घेण्याची विनंती करण्यात आली आहे.