आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या भविष्‍यवाणीने सेन्सेक्स घसरला, पैसा आपटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी निवडणुकांनंतर राजकीय अस्थैर्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, असे मत रिझर्व्ह बँकेने सोमवारी व्यक्त केल्याने बाजाराला धक्का बसला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आणि सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली. बँका, रिअ‍ॅल्टी, आयटी क्षेत्रातील समभागांना गुंतवणूकदारांच्या पवित्र्याचा फटका बसला. सेन्सेक्स 50.57 अंकांनी घसरून 21,143.01 वर स्थिरावला. निफ्टीने 22.70 अंकांच्या घसरणीसह 6291.10 ही पातळी गाठली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सांगितले, वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेच्या हालचालींना मर्यादा पडल्या आहेत. राजन यांच्या या वक्तव्यानंतर व्याजदराशी निगडित समभागांची विक्री करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल राहिला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी बाजारातून 295.76 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 16 समभाग घसरले. आशियातील जपान, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान या बाजारांत तेजी दिसून आली. जपानच्या निक्की निर्देशांकाने 1972 नंतर प्रथमच उच्चांकी पातळी गाठली.
दिल्लीत सोने-चांदी घसरले
दोन दिवसांच्या तेजीनंतर राजधानीतील सराफा बाजारात सोमवारी घसरण दिसून आली. नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 170 रुपयांनी घसरून 29,950 झाले. चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरून 44,250 झाली.
टॉप लुझर्स : इन्फोसिस, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक
टॉप गेनर्स : ०भेल ०कोल इंडिया ०एचडीएफसी ०टाटा मोटर्स
रुपया आपटला
आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मागणीचा फटका रुपयाला बसला. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया सहा पैशांनी घसरून 61.91 झाला. रिझर्व्ह बँकेने अस्थिर राजकारणाचा दिलेला इशारा आणि शेअर बाजारातील घसरणीचा फटकाही रुपयाच्या मूल्याला बसला.