आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reserve Bank Today Declare Monetary Policy, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईएमआय जैसे थे, की...! रिझर्व्ह बँकेचा आज नाणेनिधी धोरण आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किरकोळ महागाई अद्यापही चढ्या पातळीवर आहे. त्यामुळे मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणा-या नाणेनिधी धोरण आढाव्यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता नसल्याचे मत आर्थिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

रिझर्व्ह बँकेचे सध्या ग्राहक किंमत निर्देशांकावर बारकाईने लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये किरकोळ महागाईचे प्रमाण कमी झालेले असले तरी अद्यापही ते रिझर्व्ह बँकेच्या स्वीकारार्ह पातळीपेक्षा जास्त आहे.

एप्रिलमध्ये ८.५९ टक्क्यांवर असलेली किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये कमी होऊन ७.८ टक्क्यांवर आली. घाऊक महागाईदेखील लक्षणीय कमी होऊन ती चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या ५.५५ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर आली आहे.
रिझर्व्ह बँकेने १५ जानेवारीपर्यंत किरकोळ महागाईचे प्रमाण ८ टक्क्यांवर आणि जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीला पुन्हा खो देणार, असाच सूर व्यक्त केला आहे.

महागाईचा घसरता कल
किरकोळ महागाई ७.८ %, ऑगस्ट (८.५९ % एप्रिल)
घाऊक महागाई ३.७४ % ऑगस्ट ( ५.५५ % एप्रिल)

दर कपात अद्याप दूरच
*रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणताही बदल करणार नाही.
अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया
*महागाईची टांगती तलवार अजूनही कायम असल्याने व्याजदरात बदल हाेईल असे वाटत नाही.
राजन धवन, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा
* आणखी काही महिने महागाईत सातत्याने घट राहिल्यास व्याजदर कमी होऊ शकतात. रिझर्व्ह बँक जानेवारीनंतरच व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा आहे.
आर.के. दुबे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, कॅनरा बँक .
* कर्ज मागणीतील वाढ हळुवार असल्याने वैधानिक रोकड सुलभतेचे प्रमाण (एसएलआर) कमी करण्याची गरज नाही आणि तातडीने खेळत्या भांडवलाचीही गरज नाही.
एम. व्ही. टांकसाळे, कार्यकारी अध्यक्ष, इंडियन बँक्स असोसिएशन