आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retail Inflation Rises To 8.31% In March News In Divya Marathi

कांदा, बटाटा, फळांनी पुन्हा वाढवली महागाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कांदा, बटाटा आणि फळे महागल्यामुळे महागाईच्या घसरणीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यात महागाई 5.7 टक्के अशा तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

घाऊक किमतीवर आधारित अन्नधान्याची महागाई अगोदरच्या महिन्यातील 8.12 टक्क्यांवरून मार्च महिन्यात 9.9 टक्क्यांवर गेली आहे. डिसेंबरपासून महागाईने घसरणीचा कल दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात महागाई 4.68 टक्क्यांच्या नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीतील महागाईच्या अंदाजात फेरबदल करून तो अगोदरच्या 5.05 टक्क्यांवरून आता 7.17 टक्के असा वाढवण्यात आला आहे; परंतु साखर, डाळी, कडधान्ये, सिमेंट आणि खनिजांच्या किमती मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये कमी झाल्या आहेत.