आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenu Officers Constrate On Collection Of Tax : P Chidambaram's Urge

महसूल अधिका-यांनी करवसुलीच्या कामाला वेग द्यावा :पी . चिदंबरम यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - अर्थसंकल्पातील उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल अधिका-यांनी करवसुलीच्या कामाला वेग द्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी . चिदंबरम यांनी मंगळवारी केले. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीईसी) अधिका-यांना त्यांनी टिप्स दिल्या. ते म्हणाले, हे वर्ष अर्थव्यवस्था आणि महसूल जमा करण्याच्या दृष्टीने एक आव्हानात्मक वर्ष आहे. कारण यंदा आयात घटली तसेच उत्पादनही मंदावले आहे. सीमा आणि उत्पादन शुल्क अधिका-यांनी दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी करवसुली वेगाने करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कराचे 5.05 लाख कोटींचे उद्दिष्ट आहे. अप्रत्यक्ष करात उत्पादन शुल्क, सीमा शुल्क तसेच सेवाकराचा समावेश आहे.