आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स इंडस्ट्रीज आपले शेअर्स परत खरेदी करणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सगळ्यात मोठी खासगी कंपनी अशी ओळख असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने विक्रीसाठी खुले केलेले शेअर्स पुन्हा खरेदी करण्याचे ठरविले आहे. कंपनी येत्या २० जानेवारीला तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीचे शेअर्स मागील दोन-तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करीत नाहीत. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार निराश झालेत. दरम्यान, कंपनी शेअर्स खरेदी करणार असल्याच्या वृत्तामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ५० अंकानी उचलला आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचे शेअर्सच्या किमतीत आणखी वाढ होईल, असे सांगण्यात येत आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एक शेअरची किंमत ७४० रुपये आहे. मात्र कंपनी किती शेअर्स खरेदी करणार आहे, याबाबत माहिती पुढे आलेले नाही.
सप्टेंबर महिन्यात या कंपनीकडे जवळपास ६१ हजार ४९० कोटी रुपये रोख रक्कम होती. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मौल्यवान कंपनी मानली जात आहे. केआर चोकसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेन चोकसी यांनी सांगितले की, रिलायन्सचे शेअर्स चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स आता खरेदी करण्यास चांगला वाव आहे. तसेच आताची खरेदी सर्वात फायदेशीर ठरेल. रिलायन्स ही हातातील संधी गमविणार नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजने २००५ मध्ये असेच केले होते.
सोने-चांदीच्या तेजीला येणार धार