Home | Business | Gadget | rim to cut about 5,000 jobs; delays blackberry 10 launch

'ब्‍लॅकबेरी-10' लांबणीवर, 'रिम' करणार नोकरकपात

वृत्तसंस्था | Update - Jun 29, 2012, 03:53 PM IST

जागतिक बाजारपेठेत मंदी आणि स्‍पर्धेचा फटका ब्‍लॅकबेरीच्‍या‍ विक्रीला बसला आहे.

  • rim to cut about 5,000 jobs; delays blackberry 10 launch

    न्‍यूयॉर्क- ब्‍लॅकबेरी मोबाईल फोन्‍सच्‍या चाहत्‍यांसाठी एक वाईट बातमी आहे. ब्‍लॅकबेरीची निर्माती 'रिसर्च इन मोशन' जवळपास 5 हजार कर्मचा-यांची कपात करणार आहे. तसेच बहुप्रतिक्षित ब्‍लॅकबेरी-10 या नव्‍या ऑपरेटींग सिस्टिमचे लॉंचिंगही लांबणीवर टाकले आहे.
    कंपनीच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कंपनीची पुनर्रचना करण्‍यात येणार आहे. त्‍यामध्‍ये 5 हजार कर्मचा-यांची कपात करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. मंदी आणि स्‍पर्धेचा फटका ब्‍लॅकबेरीच्‍या‍ विक्रीला बसला आहे. वर्षभर अशीच स्थिती राहण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर बचत आणि खर्चांमध्‍ये कपात करण्‍याचे ठरविले आहे.
    जागतिक बाजारपेठेत सध्‍या ब्‍लॅकबेरीची हॅण्‍डसेटची विक्री मंदावली आहे. ऑपरेटींग सिस्टिमच्‍या स्‍पर्धेत ब्‍लॅकबेरीला ऍण्‍ड्राईडने जबरदस्‍त आव्‍हान दिले. त्‍यामुळे कंपनीने ब्‍लॅकबेरी-10 ही नवी सिस्टिम सादर करण्‍याची घोषणा केली. परंतु, आता तिचे सादरीकरण लांबणीवर टाकण्‍यात आले आहे. पुढील वर्षी पहिल्‍या तिमाहीपर्यंत ब्‍लॅकबेरी-10 सादर होणार नाही. ब्‍लॅकबेरी-10 मध्‍ये अतिशय अद्ययावत फिचर्स राहणार आहेत. त्‍यामुळे प्रोग्रामिंग किचकट आहे. त्‍यासाठी अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागत आहे, असे कंपनीने अधिकृत निवेदनात म्‍हटले आहे.

Trending